शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 14:49 IST

वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता एसटी कर्मचाºयांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार आहे. २९ मार्च २०१८ पासून याचा लाभ देण्यात येत असून, या तारखेला किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या किंवा सेवेतून कमी केलेल्या परंतु उपदानास पात्र कर्मचाºयांना यातील फरकाची रक्कम मिळणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात २० जून रोजी परिपत्रक जारी करून सर्व विभाग नियंत्रकांना याची अमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.केंद्र शासनाने उपदान प्रदान अधिनियम १९७२ नुसार द्यावयाच्या उपदानाची कमाल मर्यादा १७ मे २०१० च्या अध्यादेशाद्वारे १० लाख रुपये केली होती. कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक २८ जून २०१० नुसार ही कमाल मर्यादा एसटी महमांडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांनाही लागू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने २९ मार्च २०१८ ला राजपत्रित अधिसुचना काढून उपदानाच्या कमाल मर्यादेत सुधारणा केली आहे. यानुसार आता उपदानाची मर्यादा १० लाखांहून २० लाख करण्यात आली असून, ही कमाल मर्यादा २९ मार्च २०१८ पासूनच लागू करण्याची अधिसुचना केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रसारित केलेली आहे. या पृष्ठभुमीवर एसटी महामंडळाने अधिसुचनेची अमलबजावणी करण्याबाबत २० जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांना पुरवणी उपदानासह उपदानाची कमाल मर्यादा २० लाख रुपये लागू केली आहे. या परिपत्रकानुसार मार्च २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले किंवा अन्य कारणांमुळे २९ मार्च २०१८ पासून सेवेतून कमी झालेल्या; परंतु उपदानास पात्र असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जुन्या कमाल मयार्देप्रमाणे अदा केलेल्या उपदानाप्रकरणी नवीन कमाल मर्यादेनुसार फरकाचे देयक अदा करण्याच्या सुचना सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी