शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: मुलींचीच सरशी; वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:10 IST

शनिवार, ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींचीच सरशी झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २८ मे रोजी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक होती. त्याचप्रमाणे शनिवार, ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींचीच सरशी झाली आहे. विभागीय निकालाच्या बाबतीत अमरावती विभागात वाशिम जिल्हा (७५.३१ टक्के) व्दितीय क्रमांकावर असून १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे; तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.वाशिम जिल्ह्यातील ३०१ शाळांमधील ११ हजार ४५० मुले व ८ हजार ९८२ मुली असे एकंदरित २० हजार ४३२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ७ हजार ९०२ मुले आणि ७ हजार २२८ मुलींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली; तर १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.६६ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७०.३२ टक्के आहे. जिल्ह्यातील १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून वाशिम शहरातील लक्ष्मीनारायण इन्नाणी हायस्कूलमधील ८ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; मात्र एकही विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकला नाही. तसेच कारंजा तालुक्यातील काळी कारंजा येथील मॉडर्न उर्दू हायस्कुलचा निकालही शून्य टक्के लागला आहे.  जिल्ह्यात रिसोड तालुका ठरला अव्वल!दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी (८१.२७) अधिक असून हा तालुका अव्वल ठरला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये वाशिम (७८.६२ टक्के), मालेगाव (६४.४० टक्के), कारंजा (७४.५८ टक्के), मंगरूळपीर (७३.३१ टक्के) आणि मानोरा तालुक्याचा निकाल ७२.०९ टक्के लागला आहे. ४०६१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!दहावीची परीक्षा देणाºया जिल्ह्यातील २० हजार ८९ विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण झालेल्या १५ हजार १३० विद्यार्थ्यांमध्ये ४०६१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे; तर ६६२८ विद्यार्थी प्रथम आणि ३९९३ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालwashimवाशिम