शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

SSC Result 2019: दहावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात व्दितीय क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:06 IST

वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के लागला असून अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

ठळक मुद्देमुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवत बाजी मारली.जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ८१.२७ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहिर झाला. त्यात वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के लागला असून अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ४३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७५.३१ अशी आहे. उत्तीर्ण १५ हजार १३० विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ९०२ मुले व ७ हजार २२८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ७०.३२; तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ८१.६६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवत बाजी मारली.दरम्यान, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ८१.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ७८.६२ टक्के, मालेगाव तालुका ६४.४० टक्के, कारंजा तालुका ७४.५८ टक्के, मंगरूळपीर तालुका ७३.३१ टक्के आणि मानोरा तालुक्याचा निकाल ७२.०९ टक्के लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमSSC Resultदहावीचा निकाल