शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्संगाच्या प्रसारासाठी पाच वर्षांपासून स्वखर्चाने शिवरात्री उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील लोभाजी निवृत्ती वाकूडकर, हे स्वखर्चाने गावात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करीत आहेत. यात किर्तनासह महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही होतो. यंदा ४ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे.धानोरा बु. येथील लोभाजी वाकुडकर हे व्यवसायाने शेतकरी आहेत. युवावस्थेत असतानाच वाईट व्यसनांमुळे युवकांचे आणि समाजाचे होणारे नुकसान धानोरा बु. त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गावात शांततेचे सलोख्याचे वातावरण तयार व्हावे, युवकांनी व्यसनांचा मार्ग सोडावा म्हणून ते धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू लागले. या कार्यक्रमांसाठी लागणारा सर्व खर्च ते स्वत:च करतात. याच अंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी गावात स्वखर्चाने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या उत्सवात नामवंत किर्तनकारांना स्वखर्चाने पाचारण करून त्यांच्याकडून ते समाजात किर्तनाद्वारे जनजागृती घडवित आहेत. महाशिवरात्रीनिमित्त नामवंत किर्तनकारांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावाकºयांना महाप्रसाद वितरणही ते करतात. यासाठी त्यांना सर्व गावकºयांचे यथोचीत सहकार्य लाभत असून, त्यांच्या उपक्र मामुळे गावात धार्मिकवृत्तीकडे लोकांचा कलही वाढला आहे. यंदाही ४ मार्च रोजी त्यांनी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले असून, यावेळी किर्तनासाठी हभप बाळू महाराज गिरगावकर यांना आमंत्रित केले आहे. त्यांच्या साथीला मृदंग वादक, हभप गजानन महाराज कव्हर, गायनाचार्य हभप दामोदर महाराज इंगोले, हभप आसाराम महाराज, हभप गजानन महाराज भोयर, हभप भत्तऊराव महाराज, हभप मदन महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, तसेच वांगी येथील गजानन महाराज हे गायनाचार्य म्हणून राहणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सणMahashivratriमहाशिवरात्री