शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निविदा प्रक्रियेत अडकला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:50 IST

जलतरण तलाव सव्वा महिन्यानंतरही प्रत्यक्षात जनसेवेत येऊ शकला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव सव्वा महिन्यानंतरही प्रत्यक्षात जनसेवेत येऊ शकला नाही.क्रीडा विभागाच्यावतीने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात विविध क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होत आहे. जानेवारी महिन्यात जलतलावाचे कामही पूर्ण झाल्याने खेळाडूंसह शहरवासियांना जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होणार होती. २५ जानेवारी रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या जलतरण तलावाचे लोकार्पणही झाले होते. सेमी आॅलिम्पिक म्हणजेच २५ मीटर लांबी व २१ मीटर रुंदी असलेला हा सुसज्ज जलतरण तलाव एका महिन्याच्या कालावधीत जनसेवेत येणे अपेक्षीत होते.परंतू अद्याप हा जलतरण तलाव जनसेवेत येऊ शकला नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जलतरण तलाव सुरू झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या जलतरण तलाव परिसरातच लहान मुलांसही बेबीपूलची निर्मिती करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार आणि हा जलतरण तलाव केव्हा जनसेवेत येणार, याकडे वाशिमकरांचे लक्ष लागून आहे. जलतरण तलावासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच जलतरण तलाव सुरू होणार आहे.- प्रदीप शेटीये,जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम