लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक्त केले. हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी. हँडबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक्ट, शाखा कारंजा या संघटनेच्यावतीने कारंजा येथे आयोजित ३५ व्या सबज्युनिअर मुली राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ते १७ नोव्हेंबर रोजी बोलत होते. स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या हॅण्डबॉल स्पर्धेस आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट दिली. यावेळी शालेय हॅण्डबॉल स्पर्धेमध्ये राष्ट्रीय हॅण्डबॉल संघासाठी निवड झालेल्या हिंदवी काळ व इषा वानखडे यांचा तसेच क्लबचे सचिव राहुल गावंडे यांचे आई वडील उध्वराव गावंडे व शालीनी गांवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ राजीव काळे, देवेंद्र ताथोड, विजय काळे, राजुभाउ भेंडे, अनिल कानकिरड, संदिप गढवाले, संदिप काळे, उमेश माहीतकर, गटशिक्षणाधिकारी मधुसुदन बांडे, सुनिल उपाध्ये, अतुल गणवीर उपस्थित होते. प्रास्ताविक क्लबचे सचिव राहुल गांवडे यांनी तर आभार क्लबचे उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर यांनी केले.
खेळांमुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते - आमदार पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 18:15 IST