शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:28 IST

वाशिम : जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे  कलम ३६ नुसार १० जून ते २० जून  २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देकायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना १० जून ते २० जून २०१८  कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत.

वाशिम : जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे  कलम ३६ नुसार १० जून ते २० जून  २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

आगामी सण व उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे नियोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकाºयांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. मिरवणूक अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे याचे निर्देश देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक अथवा उपासनेच्यावेळी अडथळा होवू न देणे, रस्त्यावर व रस्त्यांमध्ये, घाटात किंवा घाटांवर, सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देऊळ आणि इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर गाणी, वाद्ये वाजविणे किंवा ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३, व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना १० जून ते २० जून २०१८  कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले.

 २ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २ जून २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस