शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार १२ मुद्यांवर विशेष चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:24 IST

वाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांसह ग्रामसेवकांना दिल्या.

ठळक मुद्दे१५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्राम पंचायतने ग्रामसभा घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. ग्रामसभेत विषय सूचीतील विषयांबरोबरच अन्य १२ मुद्यांवरही चर्चा घडवून आणावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाऱ्यां सह ग्रामसेवकांना दिल्या. ग्रामपंचायतच्या कराचा भरणा करणाऱ्या नागरिकालाच या ग्रामसभेत तक्रार नोंदविता येणार आहे. ग्रामसभा न घेणाºया ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांविरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचा इशाराही मीना यांनी दिला.१५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्राम पंचायतने ग्रामसभा घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. या ग्रामसभेत विषय सूचीतील विषयांबरोबरच अन्य १२ मुद्यांवरही चर्चा घडवून आणावी लागणार आहे. घरकुल योजनेच्या प्रपत्र ड यादीचे वाचन करणे, घरकुलाकरीता जागा उपलब्ध नसलेल्या घरकुल लाभार्थींचे अतिक्रमण नियमानुकूल करणे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे परिपत्रक वाचन करणे व लाभार्थी निवड करणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे परिपत्रक वाचन व लाभार्थी निवड, शाळा, अंगणवाडी केंद्रात उपलब्ध पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच सर्व मुलभूत सुविधांबाबत चर्चा करणे, दिव्यांग लाभार्थी नोंदणी व त्यांना द्यावयाचा लाभ, ग्रामपंचायत कराचा भरणा, पशुसंवर्धन विभागांतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे, ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचा पुरवठा करणे तसेच अन्य योजना व लाभार्थी अर्जांसंदर्भात चर्चा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृती आराखडा व लेबर बजेट, माझी कन्या भाग्यश्री योजनेचे सुधारीत शासन निर्णयाचे वाचन, पोषण अभियानासंदर्भात जागृती अभियान राबविणे, ग्रामपंचायत विकासाबाबतचे इतर आवश्यक विषय आदींवर या ग्रामसभेत चर्चा घडवून आणावी लागणार आहे.शासकीय योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी या योजनेची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड प्रक्रिया आदींची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत