शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष अभियान ; शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:17 IST

वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे जनजागृतीवर भर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे

वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामांना गती देणे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामुहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. वारंवार सूचना, विनंती करूनही शौचालय न बांधणाºया नागरिकांच्या घरावर आता ‘लाल स्टिकर’ लावून निर्वाणीचा इशारा दिला जात आहे. आता काही मोजक्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम केले नसल्याने गाव हगणदरीमुक्त होणार नाही. पर्यायाने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीपासून त्या-त्या गावांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, याची माहिती गावपातळीवर दिली जात आहे. स्वच्छता राखणे, महिलांची प्रतिष्ठा जपणे आणि गावविकासासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळविणे आदीसंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने पाटील आदींनी केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद