शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारावर; पण शेतकऱ्यांना फायदा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 17:53 IST

Agriculture News : सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारांवर दर मिळाले.

वाशिम : जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारांवर दर मिळाले. या वाढीव दराचा फायदा काय? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.शेतकºयांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ३६०० या दरम्यान प्रती क्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकºयांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर ७ ते ८ महिन्याने बाजारभाव वाढतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकºयांना येतो. यंदाही जून महिन्यापासून सोयाबीनचे दर विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार, २६ जुलै रोजी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल नऊ हजारांवर पोहचले. मात्र, ९५ टक्के शेतकºयांच्या घरात सध्या सोयाबीन नसल्याने या वाढीव दराचा शेतकºयांना फारसा लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा ! सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होईल.- पांडुरंग सोळंकेप्रगतशील शेतकरी सोयाबीनचे दर आता नऊ हजारावर गेले आहेत. परंतू, याचा फायदा अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकºयांना काहीच नाही. सोयाबीनचा शेतमाल तयार झाल्यानंतर प्रती क्विंटल सहा ते आठ हजारादरम्यान दर असणे शेतकºयांना अपेक्षीत आहे.- संजयकुमार सरनाईकप्रगतशील शेतकरी सोयाबीन घरात झाल्यानंतर शेतमालाच्या दरात तेजी येत आली तर याचा सर्वाधिक लाभ शेतकºयांना होईल. मात्र, ऐन हंगामातच सोयाबीनला तीन ते साडेतीन हजारादरम्यान दर मिळतात. गरज म्हणून अनेक शेतकºयांना अल्पभावात सोयाबीन विकावी लागते.- रमेश अवचार,प्रगतशील शेतकरी

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम