शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या बाजारभावात १०० रुपयाने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:39 IST

वाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे. सोमवार, ३ डिसेंबर रोजी बाजार समित्यांमध्ये ३१०० ते ३३०० रुपये प्रती क्विंटल असे दर होते.यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरिप हंगामात पावसात सातत्य नसल्याने सोयाबीन, उडीद व मूगाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. सुरूवातीला सोयाबीनला २२०० ते २८०० रुपयांदरम्यान प्रती क्विंटल बाजारभाव मिळाले. दिवाळीनंतर बाजारभाव हळूहळू वाढ होत गेली. गत आठवड्यात तर ३४०० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला चांगलीच झळाळी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवार, ३ डिसेंबरला सोयाबीनच्या प्रती क्विंटल बाजारभावात १०० ते १५० रुपये घट आल्याचे दिसून आले. सोमवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ३२०० ते ३३३५ रुपये असे प्रती क्विंटल दर होते. रिसोड बाजार समितीत ३१६० ते ३३२० रुपये असे दर होते. गत आठवड्यात वाशिम बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ३२०० ते ३४३१ रुपयांदरम्यान बाजारभाव होते. प्रती क्विंटल १०० ते १५० रुपयाने बाजारभावात घसरण झाल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम