शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘सोयाबीन बोनस’ची रक्कम जमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:25 IST

वाशिम - शासनाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांकडून तालुकास्तरीय प्रस्ताव मागवून घेतले होते.नोव्हेंबर महिन्यात बोनसची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांकडून बँक खाते मागविण्यात आले. बँक खाते क्रमांक पडताळणीअंती बोनसचा लाभ देण्यात आला.

वाशिम - शासनाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले. बँक खाते क्रमांक पडताळणीअंती बोनसचा लाभ देण्यात आला.शासनाने १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सोयाबीन विकणाºया शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांकडून तालुकास्तरीय प्रस्ताव मागवून घेतले होते. तालुकास्तरीय प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यास सुरूवातीला प्रचंड विलंब झाला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तालुका सहायक निबंधक आणि तालुकास्तर समित्यांना १० पत्रे आणि ४ अतिरिक्त शासकीय पत्रेही पाठविण्यात आली होती. प्रचंड विलंबानंतर जुलै २०१७ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व प्रस्ताव पणन संचालक पुणे यांचेकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र असून, बाजार समित्यांकडे विकलेल्या एकूण ७ लाख ३९ हजार ५६७ क्विंटल सोयाबीनच्या अनुदानासाठी १४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी नोंदविली होती. नोव्हेंबर महिन्यात बोनसची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँक खाते मागविण्यात आले. बँक खाते क्रमांकांची पडताळणी केल्यानंतर अचूक बँक खाते क्रमांकावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली. आतापर्यंत  ४४ हजार ५३२ शेतकºयांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम