शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:17 IST

वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देजूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. तथापि, जमिनीची धूप कमी होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन त्यांच्याकडून शेतकºयांना करण्यात आले आहे; परंतु जूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मुग, उडिद या पिकांच्या पेरणीवर शेतकºयांचा सद्यस्थितीत अधिक भर असला तरी, तूर आणि कपाशीची पेरणीही बºयापैकी झालेली आहे. जमिनीची धूप कमी न झाल्यामुळे भेगा पडून अंकूर सुकत आहेत. काही शेतकºयांनी दक्षता बाळगून पेरण्या स्थगित केल्या आहेत. दरम्यान, वाशिम तालुक्यातील दगड उमरासह परिसरात इतर भागाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असून, जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी