शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने बीजवाई कांदा, टोमॅटो, मूग, पपई भुईसपाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:01 IST

Sowing onion, tomato, green gram, papaya hit by hail हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्याच्या विविध भागात साेसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे शेकडो एकरावरील बीजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे अताेनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सोंगून ठेवलेल्या व काही ठिकाणी काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशातच १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक मेघ भरून येत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान, ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने सोसाट्याचा वारा सुटला व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील शेकडो एकरावर बहरलेला बीजवाई कांदा क्षणात भुईसपाट झाला. यासह उन्हाळी मूग, पपई, टरबूज, आंबा व अन्य फळपिके, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले असून महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे तत्काळ सर्वेक्षण करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विशेषत: उन्हाळी मूग, पपई, आंबा, टरबूज, भाजीपाला पिके व बीजवाई कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने सर्वेक्षण व नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. - शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटagricultureशेती