शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 16:18 IST

रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन दिवसांत झालेल्या पावसाच्या भरवशावर रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथील शेतकºयांनीच पेरणी करावी, उर्वरीत शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने १३ जून रोजी दिला.१० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. १३ जून रोजी पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात बºयापैकी पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक २ लाख ९२ हजार ५९ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होता. गतवर्षी पावसात सातत्य नसल्याने खरीप हंगामात शेतकºयांना समाधानकारक उत्पन्न घेता आले नाही. गतवर्षी कसर भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथे शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. विशेषत: मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात अधिक प्रमाणात पेरणीला सुरूवात झाली आहे. यावर्षी चार लाख ६ हजार २३४ हेक्टरवर पेरणी होईल तसेच सोयाबीनचा पेरा वाढेल अशी शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.  मानोरा तालुक्यात सर्वात कमी पाऊसगत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६.१२ मीमी पाऊस झाला. आतापर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मानोरा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. १ ते १३ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७५ मीमी पाऊस झाला. यामध्ये वाशिम तालुक्यात ६३.६७ मीमी, रिसोड तालुक्यात ८६.०२ मीमी, मालेगाव तालुक्यात १०४.५४ मीमी, मंगरूळपीर ९६.९९ मीमी, मानोरा ३१.७८ मीमी, कारंजा तालुक्यात ७०.२६ मीमी पाऊस झाला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwashimवाशिमFarmerशेतकरी