शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलानेच आईची हत्या करुन मृतदेह जाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 15:34 IST

मंगरुळपीर (वाशिम) : विळयाने वार करून जन्मदात्या आईला पोटच्या मुलानेच जीवंत जाळल्याची, मन हेलावून टाकणारी घटना मंगरूळपीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर (पंचशीलनगर) येथे ३१ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

पत्नीलाही केले गंभीर जखमी : मंगरुळपीर शहरालगतची घटनालोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : विळयाने वार करून जन्मदात्या आईला पोटच्या मुलानेच जीवंत जाळल्याची, मन हेलावून टाकणारी घटना मंगरूळपीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर (पंचशीलनगर) येथे ३१ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने पत्नीसह वहिणीलादेखील जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी अतुल गावंडे याला जेरबंद केले असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. मंगरूळपीर शहराला लागूनच असलेल्या मूर्तिजापूर येथे अतुल गावंडे हा आई व पत्नीसह राहतो. ३१ आॅक्टोबरच्या पहाटेदरम्यान झोपेतच त्याने आईवर विळ्याने सपासप वार करून नंतर जीवंत पेटवून दिले. हा प्रकार लक्षात येताच पत्नीने सासूला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू तिच्यावरही विळ्याने वार केले. आवाजाने वहिणी जागी झाल्याने तिने मदतीसाठी आरडाओरड केली. वहिणीलादेखील मारहाण केल्याचा प्रकार घडला. आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घडलेला थरार पाहून सर्वच आवाक् झाले. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. आरोपी अतूल गावंडे हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. हा प्रकार नेमका कोणत्या कारणावरून घडला, या दृष्टिकोनातून मंगरूळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत. आरोपी हा मनोरूग्ण असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीवर मंगरूळपिरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMurderखून