शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

वाशिम जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजनांना मिळणार सौर ऊर्जा!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 14:02 IST

जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.

कारंजा लाड - जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी मागणी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी उर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्फत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश दिले असुन संबंधित ग्रामपंचायत मार्फत आलेला प्रस्ताव तातडीने पाठविण्यासाठी आदेशीत केले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध केला असुन निवड झालेल्या  ग्रामपंचायतींचे काम तातडीने सुरू होणार आहे. उन्हाळ्यापुर्वी निवड झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे पाटणी यांनी सांगितले. भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांचा समावेश सौर ऊर्जेवर करण्यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली होती. सौर ऊर्जा योजना मंजुर झाल्यास सलग १२ तास ग्रामीण भागात पाणी पुरवठा होणार आहे.  अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून येत्या पाच वर्षात १४ हजार ४०० मेगॉव्हॅट वीज निर्मितीसह ४० लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असे पाटणी यांना प्रसिद्धी पत्रकात म्हटले.  सौर ऊर्जच्या माध्यमातून वीज देयकामध्ये ५० टक्के बचत होत असल्यामुळे सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापरासाठी शासनाने नवीन धोरण ठरविले आहे. शेतकºयांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीक वाचवू शकत नाहीत. या नैराश्यातून शेतकºयांच्या बहुतांश आत्महत्या झाल्या आहेत. अशा शेतकºयांच्या कुटुंबियांना अत्यंत अल्पदरात सौर कृषी पंप देण्यात यावा तसेच विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पाटणी यांनी ना.बावनकुळे यांचेकडे केली होती. 

टॅग्स :newsबातम्या