शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची तहान भागविण्यासाठी सरसावले समाज सेवक, पदाधिकारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 14:01 IST

वाशिम: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना मालेगाव आणि मंगरुळपीर येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरल्या आहेत.

ठळक मुद्देयोजना कुचकामी ठरल्याने नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.मालेगाव शहरात गत महिनाभरापासून नगरसेवक आणि समाजसेवक टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत. मंगरुळपीर शहरातही गेल्या आठवड्यापासून नगरसेवकांसह समाज सेवकांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.

वाशिम: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना मालेगाव आणि मंगरुळपीर येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्याअभावी हाल होत असल्याने दोन्ही शहरातील समाजसेवक आणि नगरसेवकांकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.  मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाल्याने दोन्ही शहरांत तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे चाकातिर्थ धरण आणि मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण आटले आहे. या धरणात आता अत्यल्प मृतसाठा उरला आहे. त्यातच मालेगाव नगर पंचायतच्यावतीने पूर्ण करण्यात आलेली कुरळा ते चाकातिर्थ या योजनेसाठी वापरण्यात आलेले एक किलोमीटर अंतराचे पाईप जुने असल्याने ते वारंवार लिकेज होऊन शहराचा पाणी पुरवठा खंडित होत आहे. तर मंगरुळपीर शहराची प्रस्तावित पाणी पुरवठा योजना वांद्यात सापडली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना कुचकामी ठरल्याने नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही शहरांतील कूपनलिका आणि विहिरी कोरड्या झाल्या आहेत. अशात मालेगाव नगर पंचायतचे काही पदाधिकारी, नगर सेवक आणि मंगरुळपीर नगर परिषदेतील काही पदाधिकारी नगरसेवकांनी नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून, मालेगाव शहरात गत महिनाभरापासून नगरसेवक आणि समाजसेवक टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत, तर मंगरुळपीर शहरातही गेल्या आठवड्यापासून नगरसेवकांसह समाज सेवकांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMangrulpirमंगरूळपीर