शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

वाशिमच्या तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच

By नंदकिशोर नारे | Updated: October 26, 2024 12:39 IST

निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते, वाचा सविस्तर

जिल्हा वाशिम

नंदकिशाेर नारे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम: जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनही मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी पाहता बंडखाेरीची दाट शक्यता असून, तशी तयारीही काहींनी चालविल्याने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सध्या बंडखाेरीचे वारे वाहत आहेत.

वाशिम व रिसाेडमध्ये महाविकास आघाडी आणि ‘वंचित’चे उमेदवार जाहीर झाले आहेत, तर कारंजामध्ये गाेपनीयता बाळगण्यात येत आहे. महायुतीमध्ये तिन्ही मतदारसंघातील उमेदवाराबाबत इच्छुकांची गर्दी पाहता निर्णय होऊ शकलेला नाही. इच्छुक असलेल्या काहींना उमेदवारी मिळणार नाही हे कळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास व महायुतीला यावेळी बंडखोरांचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • जिल्ह्यातील औद्याेगिक विकासाचा मुद्दा तीनही मतदारसंघामध्ये कळीचा ठरु शकताे. 
  •  शेतमालाला मिळत नसलेला भाव व पिक विमा रक्कम मिळण्यास दिरंगाई हा प्रश्न उपस्थित हाेऊ शकताे.
  • वाशिम पाटबंधारे मंडळ कार्यालय शेगाव स्थानांतरण केल्याचा प्रश्न कळीचा ठरु शकताे
  •  जिल्ह्यात सिंचनासाठी माेठे प्रकल्प नाहीत. सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. 
  • जिल्हा हाेऊनही अद्याप शासकीय कार्यालय, रिक्त असलेल्या जागांचा कळीचा मुद्दा ठरू शकताे.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे

विधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मते

वाशिम     ५८%    लखन मलिक     भाजप    ६६,१५९कारंजा     ६१%    रिक्त (राजेंद्र पाटणी यांचे निधन)     भाजप    ७३,२०५रिसाेड      ६३%    अमित झनक     काॅंग्रेस    ६९,८७५

हे उमेदवार झालेत जाहीर

जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ वाशिम व रिसाेड मतदारसंघात काही उमेदवार जाहीर झालेत. यामध्ये वाशिममध्ये महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तर रिसाेडमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४washim-acवाशिमrisod-acरिसोडkaranja-acकरंजाvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४