शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 12:23 IST

Sleeplessness increase due to Corona, Mobile : पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, मोबाईलवेड, मानसिक समस्या व निराशा यासह विविध कारणांमुळे अनेकांना निद्रानाशेचा त्रास जाणवू लागला आहे. पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.कोरोनाने सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत तसेच काही आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत आहेत. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला, आर्थिक अडचणी वाढल्या याबरोबरच घरातच राहावे लागत असल्याने मुलांना मोबाईल वेडही जडले. टेन्शन, मानसिक ताण, नियमित व्यायाम व सकस आहाराचा अभाव आदी कारणांमुळेदेखील पुरेशी झोप होत नाही. निरोगी आरोग्यासाठी वयोगटानुसार किती तास झोप असावी, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाही आहेत. कमी झोप झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासह विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप होईल, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

झोप का उडते?

१) विविध कारणांमुळे झोप उडते. आर्थिक यासह विविध गंभीर स्वरुपाच्या अडचणी, मानसिक चिंता, हार्मोन्स कमी होणे, टेन्शन आदी कारणांमुळे झोप येत नाही तसेच झोप उडते.२) मेंदु विकार, खोलीत लख्ख प्रकाश, गोंगाट किंवा आवाज आदी कारणांमुळेदेखील झोप उडू शकते.३) जास्त वेळ टिव्ही बघणे, मोबाईलवर खिळत राहणे, हार्मोन्स कमी होणे, सकस आहाराचा व नियमित व्यायामाचा अभाव यामुळे झोप येत नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची कोणतीही गोळी नकोविविध कारणांमुळे झोप येत नसेल तर कधी-कधी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपेची गोळी घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेणे आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते. झोपेची गोळी काही वेळेला घेतली तर या गोळ्यांची सवयही जडू शकते. त्यामुळे सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणामरोगप्रतिकारशक्ती कमी होणे.आजाराशी लढण्याची शक्ती कमी होणे.भूक कमी होणे, थकवा जाणवणे.मानसिक समस्या निर्माण होणे.

० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मुलांना शक्यतोवर मोबाईल, टिव्हीपासून दूर ठेवावे. पुरेशी झोप झाली नाही तर याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.- डॉ. रत्नेश परळकरबालरोग तज्ज्ञ,

झोपेवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे. चांगली झोप झाली तर शरीराच्या हार्मोन्सवर चांगले परिणाम होतात. हार्मोन्स व पर्यायाने पचनक्रिया वाढते. प्रत्येक पेशीची कार्यक्षमता वाढते. झोप कमी झाली तर रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.- डॉ. मंगेश राठोड, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMobileमोबाइल