शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतील कुशलचा निधी दीड वर्षापासून रखडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:15 IST

निधी जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून न आल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यात शेतकºयांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाल्यानंतरही गत दीड वर्षांपासून लाभार्थींना निधी मिळाला नाही. मात्र याच योजनेतील झालेल्या अकुशलचा कामाचा निधी प्राप्त झाला आहे. कुशलचा  लाखो रुपयांहून अधिकचा निधी जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून न आल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले.जिल्हा रोजगार हमी योजना विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रिसोड कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडे अनुदान वर्ग करावे, अशी मागणी मोठेगाव येथील  सतीश मांदळे, तांदळवाडी येथील शंकरराव देशमुख, भापुर येथील पंढरी बोडखे, शामराव बोडखे या शेतकºयांनी २३ एप्रिल रोजी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत  तालुका कृषी विभागाच्या व सामाजिक वनीकरण विभागाच्या फळबाग योजना याशिवाय इतर  योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत रिसोड तालुक्यात अनेक प्रकरणे मंजूर आहेत. ही कामे करत असताना दोन तीन टप्प्यांत अकुशलचा निधी मजुरांना दिला जातो. तर कुशलचा अंतिम टप्पा एकरकमी दिला जातो. मात्र तो लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत आहेत. अनुदानासाठी लाभार्थी सतत हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना निधी नाही, असे सांगून बोळवण केली जात आहे. यामध्ये लाभार्थींचा येण्या - जाण्यात पैशाचा व वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन लाभार्थ्यांना निधी मिळेल अशा प्रकारे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थींनी केली. या प्रकरणात मी स्वत: गांर्भीयपूर्वक  लक्ष घातलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संपूर्ण माहीती आमच्या पर्यंत वेळेवर न पोचल्याने लाभार्थ्यांस अनुदान वेळेवर मिळु शकले नाही. या प्रकरणाची संपूर्ण माहीती वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.-  शंकर तोटावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना