शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत सहा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 12:22 IST

NOTA Button News जवळपास सहा हजार मतदारांनी ‘नोटा’ला (वरीलपैकी एकही नाही) मतदान करीत उमेदवाराबाबत नापसंती दर्शविली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, जवळपास सहा हजार मतदारांनी ‘नोटा’ला (वरीलपैकी एकही नाही) मतदान करीत उमेदवाराबाबत नापसंती दर्शविली.जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला. या निकालाने अनेकांना धक्का दिला तर काहींना सत्तेची संधी दिली. दरम्यान, वाॅर्डातील एकही  उमेदवार पसंत नसेल, तर ‘ईव्हीएम’वर ‘नोटा’चा (वरीलपैकी एकही नाही) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीत एखाद्या वाॅर्डातील सर्वाधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला, तर तेथे फेरनिवडणूक घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिला आहे. या आदेशात ‘नोटा’ हा ‘काल्पनिक उमेदवार’ समजून फेरनिवडणूक घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या एकाही वाॅर्डात ‘नोटा’ला सर्वाधिक मते पडण्याचा प्रकार घडलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सहा तालुके मिळून जवळपास ५९७५ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले आहे. एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास दोन टक्के मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. या मतदारांना वाॅर्डातील एकही उमेदवार पसंत पडल्याचे दिसून येत नाही. 

वाशिम तालुक्यात सर्वाधिक ‘नोटा’वाशिम तालुक्यातील २४ पैकी पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तालुक्यातील ११४५ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून वाॅर्डातील उमेदवारांबाबत नापसंती दर्शविल्याचे दिसून येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिम