शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:03 IST

बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत १३ जणांवर  विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. या रुग्णाला एप्रिल महिन्यातच रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर कुकसा फाटा (ता. मालेगाव) येथे ट्रक चालक व क्लिनर पॉझिटिव्ह आले. यापैकी क्लिनरचा मृत्यू तर चालकाने कोरोनावर मात केली. त्यानंतर मुंबईवरून मालेगावला परतत असलेली महिला आणि तिच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाचा मृत्यू तर पाच जणांनी कोरोनावर मात केली. वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेली ६० वर्षीय महिला तसेच मध्यप्रदेशातून वाशिम येथील रेल्वे स्टेशन चौक परिसरात परतलेल्या युवतीचा कोरोना चाचणी अहवालही ३ जून रोजी पॉझिटिव्ह आला. ४ जून रोजी नवी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेली महिला पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर बोराळा हिस्से येथील एक जण आणि या रुग्णाच्या संपर्कातील एक जण,  मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षीय बालक असे तीन जण पॉझिटिव्ह आढळले. मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे आलेल्या एका जणाचा अहवाल ९ जूनला पॉझिटिव्ह आला. दरम्यान, १० जून रोजी एकूण सहा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. यामध्ये १३ रुग्ण सक्रिय आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या सहा अहवालांमध्ये चार जण हे बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील तर एक जण शेलुबाजार आणि एक जण कारंजा येथील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. शेलुबाजार येथे आरोग्य विभागाची चमू दाखल झाली असून, या रुग्णाच्या संपर्कात सात ते आठ जण आल्याची माहिती आहे. कारंजा येथेही आरोग्य विभागाची चमू दाखल झाली. डॉक्टर, कर्मचारी निगेटिव्हबोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात वाशिम येथील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर व चार कर्मचारी आले होते. या सर्वांना क्वांरटीन केले होते. या सर्वांंचे थ्रोट स्वॅब नमुना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या