आयटीआय प्रवेशात शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय
वाशिम : यंदा मूल्यमापन आधारित निकालामुळे दहावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असून, या गुणांमुळेच विद्यार्थ्यांना आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेत तुलनेत अधिक संधी प्राप्त झाली आहे. या प्रकारामुळे गतवर्षी परिश्रम घेऊन प्रत्यक्ष परीक्षा देत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांवर आयटीआयच्या प्रवेशात अन्याय होत असल्याचे दिसते.
०००००००००
शाळा भरविण्यासाठी व्यापक उपाय हवेत
वाशिम : राज्यातील काही संस्थाचालक व पालक शाळा सुरू करण्याबाबत आग्रही असताना दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यास मात्र या संदर्भात शासनाकडून नियुक्त कृती दलाचा विरोध असून, प्राथमिकच्या शाळा सुरू करायच्याच असतील, तर चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार करून व्यापक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
००००००००००००००००
४ लाख लोकांनी घेतला पहिला डोस
वाशिम : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अद्यापही अल्प प्रतिसाद लाभत आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील १३ लाख ७४ हजार ७३५ लोकांपैकी १० लाख १३ हजार १८० लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविले असताना ३ सप्टेंबरपर्यंत केवळ ४ लाख ११ हजार १९० लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
--
निर्बंधातील शिथिलतेचा गैरफायदा
वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने हे निर्बंध हळूहळू हटविण्यात आले आणि आता शनिवार, रविवार वगळता सर्वच दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली जात आहे. ही वेळ पुरेशी असतानाही व्यावसायिक मात्र रात्री १० वाजतानंतरही दुकाने उघडी ठेवत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.