वाशिम : अवर्षणामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन खरीप हंगामात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. सदर मदत निधीचे वाटप २६ जानेवारी २0१५ पूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ मदत निधी वाटप आढावा बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिल्या होत्या; मात्र अद्याप जिल्हय़ातील सहाही तालुक्यामधील शेतकर्यांचे ५ कोटी ९८ लाख ३६ हजार ४५६ रुपये देणे बाकी असून, शिल्लक आहेत. वाशिम जिल्हय़ासाठी दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी करण्यात आलेल्या मागणीच्या ४0 टक्के निधी ५७ कोटी ५३ लक्ष रुपये मंजूर करून तो दुष्काळग्रस्त शेतकर्यांना वाटप करण्यासाठी तहसील विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता. जिल्हय़ासाठी मंजूर ५७ काटी ५३ लाख रुपयांपैकी वाशिम तालुक्याला ११ कोटी रुपये, मालेगाव तालुक्याला ९ कोटी ५0 लाख, रिसोड तालुक्याला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीर तालुक्याला ८ कोटी ५३ लाख, कारंजा तालुक्याला १0 कोटी रुपये, तर मानोरा तालुक्याला ८ कोटी रूपये निधी मिळाला होता. त्यामधून मालेगाव तालुक्यात ९ कोटी ४९ लाख ७७ हजार ६६९ रूपयांचा निधी शे तकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, २२ हजार ३३१ रूपये निधी जमा आहे.
सहा कोटीच्या दुष्काळ निधीचे वाटप बाकी
By admin | Updated: January 31, 2015 00:47 IST