शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड, कारंजात शांतता; आरोपींची धरपकड सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:30 IST

३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी पुकारलेल्या बंददरम्यान रिसोडकारंजा शहरात दगडफेक करणाºयांची धरपकड सुरूच आहे. ३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी रिसोड व कारंजा शहरात बंद पुकारला होता. मोर्चादरम्यान कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर तसेच वाहनांवर दगडफेक झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात सहभाग असणाºयांची धरपकड सुरू झाली असून, ३० जानेवारी रोजी रिसोड येथे ८ तर कारंजा येथे १३ जणांना अटक केली होती. ३१ जानेवारी रोजी रिसोड शहरातून आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रिसोड येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींची एकूण संख्या आता १० झाली असून, यामध्ये चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. कारंजा व रिसोड शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिसोड शहरात एकूण १४ ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला असून तीन पेट्रोलिंग वाहने कार्यरत आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRisodरिसोड