शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:48 IST

गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकºयांनी गळीत पिकांच्या पेºयाकडे पाठ केली आहे. सोयाबीन हे तेलवाण वगळता तीळ, सूर्यफूल आदि गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात साधारणपणे पावसाचा आधार मिळत असल्याने तीळ, सूर्यफुल, भुईमुग या गळीत पिकांची पेरणी करण्यात येते. पावसामुळे शेतकºयांना या पिकांपासून बºयापैकी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. वाशिम जिल्ह्यातही साधारण १५ वर्षांपूर्वी सूर्यफुल, भुईमुग आणि तीळ या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात व्हायची; परंतु जंगलाचे प्रमाण घटल्याने वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगुस सुरू झाला. हरीण, निलगाय, रानडुकरासह इतर वन्यप्राणी गळीताच्या पिकांवर ताव मारून शेतकºयांचे नुकसान करू लागले. त्यातच वातावरणातील बदलामुळे या पिकांच्या उत्पादनाची फारसी शाश्वतीही शेतकºयांना राहिली नाही. त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामातील गळीत पिकांकडे हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी अवघ्या ८ हेक्टरवर, तर तिळाची पेरणी अवघ्या १३९ हेक्टरवर करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर गळीत पिकांची पेरणी १८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, यात सर्वाधिक प्रमाण कराळाचे आहे. भुईमुगाचा पेरा निरंकवन्यप्राण्यांचा शेतशिवारातील धुमाकूळ, तसेच वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे नगण्य दर आदि कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील भुईमुगाचा पेराच बंद केला आहे. भुईमुगाच्या ऐवजी कमी खर्चाचे आणि कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकºयांनी सोयाबीनकडे कल केला आहे. परिणामी यंदाही वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरही भुईमुगाची पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती