शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावणार - श्रीकांत देशपांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 19:46 IST

रिसोड (वाशिम): शिक्षकांशी संबंधित सर्व समस्या गांभीर्याने घेत येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनास भाग पाडू, अशी रोखठोक भूमिका शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी रिसोड येथील शिक्षक आघाडीच्या सभेत मांडली.

ठळक मुद्देरविवारी रिसोड येथे पार पडली शिक्षक आघाडीची सभा शाळांचे अनुदान, शाळांच्या याद्या व सातवा वेतन आयोग या प्रमुख मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): शिक्षकांशी संबंधित सर्व समस्या गांभीर्याने घेत येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनास भाग पाडू, अशी रोखठोक भूमिका शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी रिसोड येथील शिक्षक आघाडीच्या सभेत मांडली.स्थानिक श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक आघाडी रिसोडच्यावतीने १० डिसेंबरला आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय तुरूकमाने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आघाडी विभागीय अध्यक्ष सय्यद राजीक, संपर्क प्रमुख वसंतराव जोगदंड, तालुका अध्यक्ष भागवत घुगे, दिलीप जोशी, आढाव, सरस्वती ढेकळे, सत्यानंद कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी १ व २ जुलैला घोषित शाळांचा अनुदानाचा प्रश्न या अधिवेशनात निकाली काढून अघोषित शाळांना घोषित करून घेणे, विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांचा याद्या घोषित करणे, सातवा वेतन आयोग  केंद्राप्रमाणेच लागू करणे, इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर आमदार देशपांडे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे विधिमंडळ हे संविधानिक ठिकाण असून तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिक्षकांना न्याय मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी शिक्षक आघाडीच्या फंडातील निधी वापरून सर्वोच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचे सांगून कोणत्याही शिक्षकाला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विभागीय अध्यक्ष सय्यद राजीक यांनी शिक्षक आघाडी व आमदार देशपांडे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. सभेचे प्रास्ताविक वसंतराव जोगदंड, संचालन रवी अंभोरे यांनी तर आभार बी. डी. घुगे यांनी मानले. 

टॅग्स :Teacherशिक्षकShrikant Deshpandeश्रीकांत देशपांडे