शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून श्री बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:00 IST

मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे१२ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या यात्रोत्सवात संस्थानकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता ते सायंकाळी ५ पर्यंत ‘श्रीं’चा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे.

मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या यात्रोत्सवात संस्थानकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक कार्यक्रम असून सकाळी ११ वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे वाचन हभप विठ्ठलदास महाराज ठाकरे व संच रा.पिंप्री खु. यांचे मधूर वाणीतून होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता हनुमंत महिला भजन मंडळ मंगलधाम यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता ते सायंकाळी ५ पर्यंत ‘श्रीं’चा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसाद वितरण व्यवस्था श्री जय हनुमान मंडळ वरूड हे करणार आहेत. रात्री ८ वाजता हभप मानिकराव पाटील रा.कारखेडा यांचा  किर्तनाचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद पुजेकरीता संत दर्शनीनाथ महाराज रा.दिल्ली, संत भोलेनाथ महाराज वनोजा, संत अभेदनाथ गुरु सेवानाथजी रामापूर मठ यांची उपस्थिती  राहणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गावामधून ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार असून दुपारी १२ ते १.३० दहीहांडी व गोपाळकाला हभप  पल्लाव देशमुख व संच रा.गिरोली यांचेमधून वाणीतून तसेच श्री संत बाबू महाराज राहीत साहीत यांचे हस्ते होणार आहे. पालखी सोहळा मिरवणूकीमध्ये विविध महिला वारकरी भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथील वृद्ध महिला व पुरुषांना संस्थानकडून कपडे, ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. संत श्री अच्युत महाराज भजन स्पर्धा समिती मंगरुळपीर यांच्याकडून एक लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

टॅग्स :washimवाशिम