शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी होणार लोकार्पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:31 IST

वाशिम : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथे ‘डिजिटल लॉन्चिंग’ पध्दतीने ५ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथे ‘डिजिटल लॉन्चिंग’ पध्दतीने ५ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून होणार आहे. वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्हयाचे सह पालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपिकिशन बाजोरिया, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारास ३ हजार रुपये इतकी किमान निश्चित पेंशन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयात अलिकडेच नाव नोंदणी झालेल्या असंघटीत कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते यावेळी कार्ड वाटप करण्यात येणार आहे. तसेच इच्छुकांनी या योजनेत नाव नोंदणी करण्याची संधी लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहे. त्यासाठी केवळ आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक सोबत आणावे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगारांच्या आजच्या वयानुसार किमान ५५ रुपये ते कमाल २०० रुपये एवढा पहिला हप्ता भरुन योजनेत समाविष्ट होता येईल. जिल्हयातील असंघटीत कामगारांनी या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना