लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला सलाईन लावून तिला तब्बल १ तास ‘आयसीयू’च्या दाराजवळ ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने २ सप्टेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून उघडकीस आणला. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत याप्रकरणी जबाबदार असलेल्या दोन परिचारिकांना प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी ५ सप्टेंबरला ‘शो-कॉज’ नोटिस बजावली आहे. वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून येथे २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तज्ज्ञ डॉक्टरांसह महत्वाच्या विभागांमधील कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज बहुतांशी ढेपाळले. अशातच कार्यरत परिचारिकांवर कुणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यांनी मनमानी चालविली. याचा प्रत्यक्ष प्रत्यय ‘लोकमत’ने २ सप्टेंबरला केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान आला. प्रकृती अत्यंत खालावलेल्या अवस्थेत असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेस संबंधित डॉक्टरांनी तिच्यासोबत असलेला तिचा मुलगा आणि सुनेसोबत ‘आयसीसीयू’मध्ये जायला सांगितले. त्यानुसार, रुग्णासह तिघेही ‘आयसीसीयू’मध्ये गेले; परंतू त्याठिकाणी एकही परिचारिका अथवा आरोग्य कर्मचारी हजर नसल्याने तब्बल पाऊन ते एक तास वृद्ध रुग्णाला ताटकळत राहावे लागले. ही बाब ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून उजागर केली. त्याची दखल घेत प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी याप्रकरणी साबळे आणि खंडारे नामक दोन परिचारिकांना कारणे दाखवा नोटिस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.
‘आयसीयू’तील दांडिबाज परिचारिकांना ‘शो-कॉज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:48 IST
एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला सलाईन लावून तिला तब्बल १ तास ‘आयसीयू’च्या दाराजवळ ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने २ सप्टेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून उघडकीस आणला. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत याप्रकरणी जबाबदार असलेल्या दोन परिचारिकांना प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी ५ सप्टेंबरला ‘शो-कॉज’ नोटिस बजावली आहे.
‘आयसीयू’तील दांडिबाज परिचारिकांना ‘शो-कॉज’!
ठळक मुद्दे७५ वर्षीय वृद्धेस सलाईन लावून १ तास ‘आयसीयू’च्या प्रवेशद्वारा जावळ ठेवले ताटकळत‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आला हा गंभीर प्रकारप्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी २ परिचारिकांना बजावल्या ‘शो-कॉज’ नोटिस