वाशिम : स्थानिक पाटणी चौकात पालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलाचे फुटपाथ काही दुकानदारांनी चक्क गिळंकृत केले आहे. परिणामी येथे वाहतूकीची कोंडी होत असुन याचा फटका ग्राहक व व्यापारी दोघांनाही सोसावा लागत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी गत फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु पालिका प्रशासनाने सदर आदेश आजपावेतोही धाब्यावरच बसविले असल्याचे दिसुन येत आहे.स्थानिक नगर पालीकेने पाटणी चौकातील रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी संकुल बांधलेले आहे. सदर संकुलाच्या परिसरात पूर्वी रविवारचा बाजार भरत असल्यामुळे संकुलाला रविवार बाजार संकुल असेच नाव पडलेले आहे. या संकुलात किराणा, कपडे व इतरही व्यापार्यांनी आपले दुकान थाटलेले आहे. यापैकी बर्याच दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील फुटपाथवरही अतिक्रमन केलेल्ो आहे. सदर दुकानदार आपला माल ठेवण्यासाठी हे फुटपाथ वापरत आहेत. परिणामी, नागरिकांना पायदळ चालण्यासाठी फुट पाथवर जागाच शिल्लक उरलेली नाही. काही दुकानदारांनी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या मिरच्या, पाण्याच्या टाक्या व इतर वस्तु फुटपाथवर ठेवलेल्या आहेत. अनेकवेळा या मिरच्यांमुळे वाहनधारकांना त्रास सोसावा लागतो. विशेष करून उन्हाळ्यात या त्रासाचे प्रमाण अधिक असते. सदर फुटपाथवर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमनाबाबत पालीकेच्या प्रशासनाला किंचीतही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी गत वर्षी फेब्रुवारी महिन्यात पालीकेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना पाटणी चौकातील रविवार बाजार व्यापारी संकुलासमोरी फुटपाथवर दुकानदारांनी केलेले अ ितक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.
चक्क दुकानदारांनीच गिळले फुटफाथ
By admin | Updated: November 23, 2014 00:27 IST