शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तधान्य दुकानदार  धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:01 IST

वाशिम :  मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले.

ठळक मुद्देमालेगाव येथील एका स्वस्त धान्य दुकानात गुरूवारी दुकानदार व ग्राहकात वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत या मालेगावच्या घटनेचा निषेध नोंदविला. मालेगाव येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

वाशिम :  मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत या मालेगावच्या घटनेचा निषेध नोंदविला तसेच ‘पॉस मशीन’ने धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला.मालेगाव येथील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकाला आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितल्यावरून गुरूवारी दुकानदार व ग्राहकात वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. जिल्हा पुरवठा विभागाने आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना आधार कार्डसंदर्भात सूचना दिल्या जातात, असे स्वस्त धान्य दुकानदारांनी निवेदनात नमूद केले. आधार कार्ड मागितल्यावरून स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण होत असेल तर ही घटना निंदनीय असून, यापुढे ग्राहकांकडून आधार कार्डची मागणी केली जाणार नाही, असा निर्णय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने घेतला. स्वस्त धान्य दुकानदारांना कोणतेही संरक्षण नाही आणि ग्राहकांना कायद्याची भीती नसल्यामुळे आधार कार्ड सक्तीचे करण बंद केले जाईल तसेच सर्व दुकानदार ‘पॉस मशिन’ तहसिल कार्यालयात जमा करतील, असेही निवेदनात नमूद आहे. मालेगाव येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय