शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैननजिक वसारी येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून ह्यशोलेह्ण आंदोलन ४ मे रोजी भरउन्हात दुपारी १ वाजताच्या दरम्यान केले. पाण्याच्या टाकीवर घोषणा करुन त्यांनी यावेळी सर्वाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांवर संकटांची मालीका सुरु असतांना शासनाच्यावतिने शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रीत केल्या जात नसल्याचा रोष यावेळी शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामीनाथन आयोग लागू करा व शेतमालाला हमी भाव देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यासाठी वसारी येथील शेतकऱ्यांनी शोले आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवरुन विविध मागण्यांची घोषणाबाजी करीत लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांच्यावतिने देणयात आला. या आंदोलनामध्ये दामोदर इंगोले, प्रदिप मोरे, गजानन देशमुख, अवी बिल्लारी, रोहीत माने, रवी शिंदे, वैभव जाधव, गोरख बोरकर, अजय इंगोले, अमोल बळी, भगवान जाधव, संतोष जाधव, शरद कोरडे यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता.
भरउन्हात शेतकºयांचे ‘शोले’ आंदोलन
By admin | Updated: May 4, 2017 19:11 IST