शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:21 IST

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देतुकाराम हा दवाखान्यामध्ये पत्नीला भेटायला गेला त्यावेळीच त्याने मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले होते. त्याने पत्नी ज्योती हिला घराबाहेर आपल्याला आधार कार्ड काढायचे आहे असे सांगुन सकाळी ११ वाजता घराबाहेर घेऊन गेला.  पोलीसांनी तुकाराम याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर ज्योतीच्या डोक्यावर मोठमोठे दगड टाकून तीची हत्या केल्याचे उघडकीस आले.

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. शेलूबाजार (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती पानभरे (माहेरचे नाव) हिचा एक वर्षापूर्वी वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील तुकाराम कुरवाडे याचेशी विवाह झाला. तुकाराम कुरवाडे हा मजुरीचे काम करतो. लग्नानंतर काही दिवसाने ज्योती व तुकाराम या दोघांमध्ये छोट्याशा कारणावरून भांडण होत असे. ज्योती हिला गर्भधारणा झाल्यानंतर प्रसुतीसाठी ती माहेरी शेलुबाजार येथे गेली होती. ज्योतीची शेलुबाजार येथे खासगी रूग्णालयात प्रसुती झाली. तीला मुलगी झाल्याचे वृत्त पती तुकाराम यांना मिळाले. तुकाराम हा दवाखान्यामध्ये पत्नीला भेटायला गेला त्यावेळीच त्याने मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले होते. तेंव्हापासून तुकाराम अस्वस्थ असायचा. तुकाराम हा १५ जुन रोजी शेलुबाजार येथे आपल्या सासुरवाडीला आला. त्याने पत्नी ज्योती हिला घराबाहेर आपल्याला आधार कार्ड काढायचे आहे असे सांगुन सकाळी ११ वाजता घराबाहेर घेऊन गेला. तेंव्हापासून दोघेही रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने कुटूंबीयांनी पोलीसांकडे धाव घेतली. पोलीसांनी लगेचच ज्योतीचा पती तुकाराम याला ताब्यात घेतले. परंतू तुकाराम याने गुन्ह्याची कबुली न दिल्यामुळे त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीसांनी तुकाराम याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर ज्योतीच्या डोक्यावर मोठमोठे दगड टाकून तीची हत्या केल्याचे उघडकीस आले. वृत्त लिहेस्तोवर मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :washimवाशिमMurderखूनCrimeगुन्हा