शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे शिवसेनेचे आंदोलन : ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:08 IST

वाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देनुकसानभर पाईसाठी कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भाचे शिवसेना संपर्क नेते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील व माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वीच बोंडअळीसमोर बीटी बियाणे टिकत नसल्याचे कृषी विभागाला कळविले होते. या कापूस संशोधन संस्थेच्या अहवालाची दखल घेतली असती तर शेतकर्‍यांना आज या विपरित परिस्थितीला तोंड देण्याची गरज पडली नसती. मात्र कृषी विभागाने बीटी बियाणे कंपनीच्या लाभासाठी शेतकर्‍यांना खाईत लोटले, असा आरोप करीत शिवसेनेच्या शेकडो पदाधिकार्‍यांनी स्थानिक अकोला नाका चौकात बोंडअळी सोबतच कृषी विभागाची होळी करून निषेध नोंदविला. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन दिले. आठ दिवसाच्या आत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही तर शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा निवेदनातून दिला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड, उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, दिनेश राठोड, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, नगरसेवक कैलास गोरे , नितीन मडके, अतुल वाटाणे, मधु इतकर, संतोष इंगळे, राजाभय्या पवार, सुरेश इंगळे, सतिष खंडारे, रवी पाटील, दिलीप कास्टे, रामा इंगळे, विठ्ठल चौधरी,पवन इंगोले, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संगिता पिंजरकर, ज्योती खोडे, सुनिता गव्हाणकर, भाग्यश्री राठोड, तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, रामदास मते, संतोष सुरळकर, नरहरी कडू, रवि पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाagitationआंदोलन