शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:27 IST

दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा  :  या भागातील पिक परिस्थितीचा, शेतकरी आत्महत्येचा गांभीर्याने विचार करुन कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, केंद्रीय पथकाला बोलावून या भागाची पाहणी करुन दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली. यावेळी शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात अधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.शिवसेनेच्यावनिते उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यावर्षीच्या हंगामात परतीच्या पावसाने दडी माल्यामुळे खरिपातील मुग, उडीदासह सोयाबीन पिकांचे उत्पादनात कमालीची घसरण झाली. तर तूर या पिकाची सुध्दा अंत्यत बिकट अवस्था आहे. त्यामुळे दुष्काळाची भयानक अवस्था असल्यामुळ या भागातील शेतकरी व शेतमजुर कामाकरिता स्थलांतर करीत आहेत. गत हंगामातही तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावल्यामुळे सोयजना येथील शेतकरी रामदास मिसाळ , कारंजा तालुक्यातील कुपटी येथे मंगेश लव्हाळे यांनी आत्महत्या केली होती.  तसेच दोन्ही तालुक्यातील मागील खरिप हंगामातील आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असतांना सुध्दा शासनाकडून या भागातील शेतकºयांना कोणतीच मदत मिळाली नाही. सन २०१८-१९ या वर्षात जिल्हयात सर्वात जास्त आत्महत्या या कारंजा तालुक्यात झालेल्या आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून सततच्या नापिकीमुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे व येथील शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, नरहरी कडू, कन्हैया ठाकुर, गजानन बनारसे, उकंडा राठोड, श्रीकृष्ण चौधरी, शालीकराम रसाळे, किशोर नेतनकर, बंडू घाटे, रामचंद्र लव्हाळे, विजय राऊत, पांडुरंग दहापुते, गजानन घाटे, गोपाल घाटे, दत्तात्रय राठोड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाShiv SenaशिवसेनाManoraमानोरा