शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरचे स्वातंत्र्य सेनानी स्मारक दुर्लक्षीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:32 IST

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे. 

ग्रामपंचायतची उदासीनता: देशासाठी बलिदान देणाºयांचा विसरलोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन: भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देणाºया, तसेच लष्करात देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरपूर येथे ५८ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य सेनानी स्मारकाची उभारण करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे स्मारक त्यावेळच्या ग्रामपंचायतने उभारून येथे राष्ट्रीय सणानिमित्त सभा, सामाजिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिक आनंदराव मनाटकर, विष्णूजी पौळकर व देशमुख यांनी स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. सुरुवातीची २५ ते ३० वर्षे येथे नियमित कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे; परंतु कालांतराने या स्मारकावर कार्यक्रम आयोजित करण्याचा विसर पडू लागला आणि त्यामुळे हे स्मारक दुर्लक्षीत झाले. केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीनिमित्त या स्मारकाची साफसफाई केली जाते; परंतु अनेक वर्षांपासून त्याची रंगरंगोटी झाली नसल्याचे दिसते. या ठिकाणी आता घाणकचरा पसरत असून, स्मारकाची फुटतूटही झाली आहे. गत चार वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दामोदर सारडा यांनी या दुर्लक्षीत स्वातंत्र्य सेनानी स्मारकाच्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतचा ठरावही घेतला; परंतु तो कागदावरच राहिला. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही या स्मारकाची साफसफाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन