शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पोलिसांच्या एकमेव वाहनाचे तुटले ‘एक्सेल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 18:21 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनकडे असलेले एकमेव चारचाकी वाहन नादुरूस्त होण्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. बुधवारी देखील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी गेलेल्या या वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनकडे असलेले एकमेव चारचाकी वाहन नादुरूस्त होण्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. बुधवारी देखील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी गेलेल्या या वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली. शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत ५९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. त्यासाठी मात्र शिरपूर पोलिस स्टेशनला एकमेव चारचाकी वाहन देण्यात आले असून दैनंदिन गस्तीची कामे यामुळे प्रभावित होत आहेत. अशातच हे वाहन नादुरूस्त राहत असून त्याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा एकवेळ आला. बारावीची परीक्षा सुरू असणाºया पीर मोहम्मद हायस्कूल या केंद्राला भेट देण्यासाठी गेलेले नवनियुक्त ठाणेदार संजय खंदाडे यांना वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने वाहन तिथेच ठेवून परीक्षा केंद्रापासून पोलिस स्टेशनपर्यंत पायदळ जावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. काही दिवसांपूर्वी एकच वाहन आणि तेही परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आल्याने आरोपींना पायदळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याच्या मुद्यावरून चांगलाच वाद झाला. याप्रकरणी पोलिस स्टेशनच्या आवारात काही महिलांनी पाच दिवस साखळी उपोषण केले. तथापि, शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया गावांची संख्या व लोकसंख्येची व्याप्ती पाहता किमान आणखी एक वाहन शिरपूर पोलिस स्टेशनला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन