शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पोलिसांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा वसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:22 IST

पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न शिरपूर पोलीस करीत असून, याच उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. या वृक्षांना पाणी घालण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी वेळा आणि दिवसही वाटून घेतले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे झाडे चांगलीच वाढली आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी दक्ष राहणाºया पोलिसांना इतर सामाजिक कार्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. तथापि, मिळेल त्या वेळेतूनही समाजाचा घटक म्हणून आपले दायित्व पार पाडण्याचे कोणतीही संधी पोलीस सोडत नाहीत. याचा प्रत्यय शिरपूर येथे येत आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी अनेक रोपांची लागवड केली. त्यातील ५० हून अधिक झाडे पोलीस स्टेशनच्या आवारातच लावली. केवळ वृक्षारोपण करून चालणार नसल्याचे त्यांना चांगले माहिती होते. त्यामुळे ही झाडे जगविण्याचा संकल्पही त्यांनी केला. यासाठी चर्चा करून झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि या कामासाठी वेळा व दिवस निश्चित केले. ही जबाबदारी घेण्यापूर्वी जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘ट्री गार्ड’ही लावले. पावसाळा संपला की या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. त्यामुळे पोलीस कर्मचारी काळजीने या झाडांना पाणी घालतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्यावाचून जीव कासाविस होत आहे. तसेच वृक्षांनाही पाण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी रामेश्वर जोगदंड, रमेश गोडघासे यांच्यासह इतर कर्मचारी वेगवेगळ्या दिवशी आळीपाळीने झाडांना पाणी देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच दोन वर्षांपूर्वी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता बरीच मोठी झाली आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन