शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

...तिला बाळाला अखेरचे पाजताही आले नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:08 IST

सर्पदंश झालेला असल्याने इच्छा असूनही ती माता आपल्या बाळाची भूक शमवू शकली नाही.

ठळक मुद्दे बिळातून एक विषारी साप बाहेर आला आणि त्याने जयश्री गंगावणे हिला दंश केला.ग्रामस्थांनी धाव घेत उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविले.चिमुकलीची भूक पाहून जयश्रीचा पान्हाही दाटून आला आणि चिमुकलीही दुध पिण्यासाठी कासाविस झाली.

देपूळ : येथील एका महिलेस विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी तिला रूग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तिने आपल्या तीन महिन्याच्या चिमुकलीस सोबत घेतले. ती निरागस भुकेजलेली चिमुकली दुध पिण्यासाठी कासाविस झाली; परंतु सर्पदंश झालेला असल्याने इच्छा असूनही ती माता आपल्या बाळाची भूक शमवू शकली नाही, हा हृदय हेलावणारा प्रसंग वाशिम तालुक्यातील देपूळच्या ग्रामस्थांनी गुरुवारी अनुभवला. त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले होेते.देपूळ येथील रामेश्वर महादेव गंगावणे यांची २५ वर्षीय पत्नी जयश्री रामेश्वर गंगावणे ही गुरुवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी घरासमोरच्या ओट्यावर बसली असता दुपारी २.४५ मिनिटांनी ओट्यात असलेल्या बिळातून एक विषारी साप बाहेर आला आणि त्याने जयश्री गंगावणे हिला दंश केला. त्यामुळे ती किंचाळली. ग्रामस्थांनी धाव घेत उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविले. जयश्रीला ३ महिन्यांची एक चिमुकली असल्याने तिने त्या चिमुकलीसही सोबत घेतले. त्यावेळी चिमुकली भुकेने व्याकूळ झाली होती. चिमुकलीची भूक पाहून जयश्रीचा पान्हाही दाटून आला आणि चिमुकलीही दुध पिण्यासाठी कासाविस झाली; परंतु आपल्या शरीरात सापाचे विष भीनले आहे. बाळाला दूध पाजल्यास त्याच्या जिवालाही धोका होईल. आपला जीव जात असताना बाळाला काही होऊ नये म्हणून तिने कठोर काळजाने चिमुकलीच्या भुकेकडे दुर्लक्ष केले आणि इच्छा असतानाही मुलीला दुध पाजले नाही. तिच्या आणि चिमुकलीच्या व्यथेचा हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग देपूळकरांनी पाहिला. त्यामुळे त्या सर्वांचे डोळेही पाणावले. अवघ्या काही मिनिटांतच जयश्रीचा मृत्यू झाला आणि सर्पदंशाने एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हिरावून घेतले.

टॅग्स :washimवाशिम