शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शिरपूर जैनमधील पशूधन विकास अधिकारी पद रिक्त; १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 18:13 IST

शिरपूर जैन: येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकाºयाची अबदली आॅक्टोबर २०१७ च्या सुरुवातीला करण्यात आली. तेव्हापासून या केंद्रात नवे अधिकारी रुजू झालेच नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावरच आहे. 

ठळक मुद्देशिरपूर जैन पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत १३ गावे येतातसर्व गावांत मिळून एकूण पशूधनाची संख्या ही १४ हजारांहून अधिक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकाºयाची अबदली आॅक्टोबर २०१७ च्या सुरुवातीला करण्यात आली. तेव्हापासून या केंद्रात नवे अधिकारी रुजू झालेच नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावरच आहे. शिरपूर जैन पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत १३ गावे येतात. या सर्व गावांत मिळून एकूण पशूधनाची संख्या ही १४ हजारांहून अधिक आहे. या सर्व पशूंवर नियमित लसीकरण करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी येथे डॉ. स्वप्नील महाळंकर या पशूधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली; परंतु ६ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांची या केंद्रातून बदली करण्यात आली आणि त्यांनी या दिवशीच आपला प्रभारही सोडला. त्यांच्या ठिकाणी डॉ. जया राऊत या महिला पशूधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली; परंतु आता पाच महिने उलटत आले तरी, शिरपूर येथील पशूवैद्यकीय केंद्रात त्या रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे या कें द्रांतर्गत येणाºया १३ गावातील पशूंवर नियमित उपचार करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, रिठद येथील केंद्राचे पशूधन विकास अधिकारी पी. एन. कापगाते यांच्याकडे शिरपूरच्या पशूवैद्यकीय केंद्राची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना शिरपूरच्या केंद्रात आठवड्यातून दोन वेळा भेट देऊन पशूंवर उपचार करावे लागतात. तथापि, केवळ दोन दिवसांत १४ हजारांवर पशूंचे उपचार करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे येथील पशूपालकांना नाईलाजास्तव खासगी पशूवैद्यकांकडे धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान, या संदर्भात पी. एन. कापगाते यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेतली असता. आपणांकडे दिलेली जबाबदारी पार पाडण्याशिवाय आपण याबाबत काहीच सांगू शकणार नसल्याचे, तसेच येथील नियमित अधिकारी रुजू कधी होतील, याबाबत जिल्हास्तरावरूनच माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी  सांगितले. 

टॅग्स :washimवाशिम