शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लाइक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

अलीकडच्या दहा वर्षांत स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. या स्मार्ट फोनवर व्हॉटसॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाचा वापर ...

अलीकडच्या दहा वर्षांत स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. या स्मार्ट फोनवर व्हॉटसॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाचा वापर सहज शक्य असल्याने अनेक जण वेळ घालविण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी या सोशल मीडियाचा मनसोक्त वापर करतात. या मीडियावर काही समाजभान नसलेले आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा आहे. ही मंडळी जहाल, तीव, भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शांतता भंग करणाऱ्या, वात्रट पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देते. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून शेअर झाली, लाईक किंवा फॉरवर्ड झाली, तर तुमच्यावरही माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

----------

कोट: -सोशल मीडियाचा वापर सर्वांनी काळजीपूर्वक करावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, वात्रट, व्हल्गर पोस्टला लाइकही करू नये, या बाबीची पालन केल्यास तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहू शकता.

-अजयकुमार वाढवे,

पोलीस निरीक्षक, सायबर विभाग, वाशिम

-------

बॉक्स : मुलींनो डीपी सांभाळा

काही तरुणी व्हॉटसॲपसारख्या सोशल मीडियावर आपले स्वत:चे छायाचित्र डीपी म्हणून ठेवतात. मात्र याच डीपीचा वापर करून सायबर गुन्हेगार अश्लील पोस्ट तयार करणे किंवा गैरवापर करून बदनामीचा प्रयत्नही करू शकतात. यामुळे तरुणींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून, आपल्या छायाचित्राचा गैरवापर टाळण्यासाठी स्वत:चे छायाचित्र न ठेवता निसर्गचित्र, सुभाषितांची छायाचित्रे, ठेवणे कधीही योग्यच ठरते.

----------------

बॉक्स: सोशल मीडियाचा वापर करा जपून

एफबी, व्हॉट्सॲप आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रक्षोभक, अश्लील मेसेजेस शेअर होतात. अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही व्हॉट्सॲप, फेसबुकचे जणू व्यसन लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी कनेक्ट होता येते, पण त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली तर, लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते.

-------

बॉक्स : अशी घ्या काळजी

सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय एफबी किंवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे. एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते. मेसेज शेअर किंवा लाइक करताना आपण काही चुकीचं पाठवत नाही ना, याचे भान आपणच राखले पाहिजे.