शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 3:43 PM

दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी : गतिरोधक बसविण्याच्या मुद्यालाही बगललोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलासह एका बकरीला चिरडल्याची घटना शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रविवार, २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. या दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.अलिकडच्या काळात औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संभाव्य वाहन अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. २५ नोव्हेंबर रोजी कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया ट्रकने शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ १३ वर्षीय सतिष संजय टोंचर या मुलासह बकरीला चिरडले. या दुर्घटनेत सतीष टोंचर व बकरी जागीच ठार झाले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबर रोजी शेलूबाजार बाजारपेठ बंदची हाक दिली होती. सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शेलूबाजार वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढावा आणि गावात आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. या बंदमध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन