शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतरसाठी मिळणार भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:37 IST

वाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गासाठी भरीव निधी मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.नॅरोगेज मार्गावरून धावणारी शकुंतला रेल्वे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्यास ही रेल्वे पुन्हा धावू शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून २१४७.४४ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी प्राप्त आहे. त्याचा ५० टक्के अर्थात १०७३ कोटी रुपये राज्यशासनाने उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. तसा प्रस्ताव मुंबई मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी राज्यशासनाकडे यापुर्वीच पाठविला असून त्यास शासनाने मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीरतेने घेवून २८ जून रोजी राज्याचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांना पत्र पाठवून निधी मंजूरीच्या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यायोगे निधी मिळण्याचा मार्ग बहुतांशी मार्गी लागल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.दीड वर्षांपासून शकुंतला रेल्वे बंदइंग्रजांच्या राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे नॅरोगेज मार्गावरून धावत असताना विविध स्वरूपातील समस्या निर्माण झाल्या होत्या. देखभाल-दुरूस्तीअभावी ही रेल्वे प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकारही वाढीस लागल्याने गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेचा प्रवास बंद आहे.

टॅग्स :washimवाशिमShakuntala Trainशकुंतला रेल्वेRajendra Patniराजेंद्र पाटणी