शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सात भरारी पथके      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:03 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते व बियाण्यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क         वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते व बियाण्यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. त्या शिवाय सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, २० गुण नियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाकडून ग्रामीन जिवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत बचतगटांतर्फे शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यात येत आहेत. त्यानंतरही शेतकºयांना बियाण्यांसह विविध खतांची गरज भासणार असल्याने खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर जावे लागणार आहे. यात शेतकºयांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, परवाना नसलेल्या कृषी निविष्ठांची विक्री कृषीसेवा केंद्रांकडून होऊ नये म्हणून कृषी विभागाने व्यापक उपाय योजना केल्या आहेत. त्यात जिल्हाभरात सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, २० गुण नियंत्रण निरीक्षकही नियुक्त केले आहेत. हे गुण नियंत्रण निरीक्षक सर्व कृषीसेवा केंद्रांना भेटी देऊन त्यांच्याकडे परवाना असलेल्या कृषी निविष्ठांची तपासणी करीत आहेत.  

तपासणीसाठी नमुन्यांचे संकलन पूर्णयंदाच्या खरीप हंगामाठी कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी निर्धारित लक्षांकानुसार एप्रिल, मे व जून अखेर नमुन्यांचे संकलन १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, हे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. कृषी निविष्ठांच्या या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्र्यवाही कृषी विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी दिली आहे.

शेतकºयांची फसवणूक टाळण्यासाठी सहा तक्रार निवारण कक्ष, २० गुण नियंत्रण निरीक्षक, सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकºयांनीही अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे, खते खरेदी करावी आणि खरेदीची पावती स्वाक्षरीनिशी घ्यावी. खरेदी केलेल्या निविष्ठांच्या वेष्टनावरील माहिती तपासून घ्यावी आणि काही तक्रारी असल्यास तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी. खरेदी पावती, ७/१२ व ८ -अ उताºयासह ही तक्रार करता येईल. -एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी