शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 15:42 IST

CoronaVirus News शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.

वाशिम : मार्च महिन्यात सुरूवातीच्या सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आॅगस्ट ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांनी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. याला वाशिमकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी महिन्यापर्यंत हा आलेख खालावलेला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार येत १४ फेब्रुवारीपासून अचानक कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मार्च महिन्यात यामध्ये आणखी वाढ झाली. वाशिम शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गत सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या