शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:59 IST

वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २५ सप्टेंबरपासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. प्रशासनातर्फे लेखी आश्वासन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या  उपोषणाची सांगता २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास केली. 

ठळक मुद्देविविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २५ सप्टेंबरपासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. प्रशासनातर्फे लेखी आश्वासन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या  उपोषणाची सांगता २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास केली. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ‘एल्गार’ पुकारला होता.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आणि साखळी अशा दोन्ही प्रकारातील उपोषणाला विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनुसूचित जमातीच्या मुलांकरिता उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, या हेतूने आदिवासी शासकीय वसतीगृहाची योजना सुरु करण्यात आली. मात्र, स्थानिक वसतीगृहांमध्ये पदवी व पदव्युत्तरच्या उर्वरित विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात प्रवेश देण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा, वाशिम जिल्हयातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहाचा कोटा वाढविण्यात यावा, वस्तीगृहासाठी शासकीय इमारत मिळावी, डीबीटी वाढवून मिळणे, नवीन वसतीगृहासाठी मिळालेल्या शासकीय जागेचे त्वरित भुमिपूजन करणे व बांधकामास सुरुवात करणे, मागील वर्षाची शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, वसतीगृहाचा गृहपाल त्वरित  बदलण्यात यावा, नवीन वसतीगृह  प्रकल्प अधिकाºयाने दर महिन्याला वस्तीगृहास आश्रमशाळेस भेटी द्याव्या, एमएससीआयटी व टायपींगची विद्यार्थ्यांना दोन संस्थेवर संधी उपलब्ध करुन द्यावी, जुन्या वसतीगृहाच्या इमारतीची रंगरंगोटी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपोषणाच्या चवथ्या दिवशी खासदार भावना गवळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप जाधव, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकाºयांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. खासदार गवळी व जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाºयांना केल्या. ज्या मागण्या प्रकल्प स्तरावरील आहेत, त्या तात्काळ तर काही मागण्या एक ते दिड महिन्यात सोडविण्याबाबत लेखी  आश्वासन देण्यात आले.  शासनस्तरावरील मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. लेखी आश्वासनाने विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.