शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’ ठप्प; बदलीपात्र शिक्षकांची पंचाईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:25 IST

आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देजिल्हांतर्गत बदली प्रक्रियाअर्जासाठी केवळ २३ आॅक्टोबरपर्यंत मुदत 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २०१७ च्या  धोरणास स्थगिती दिल्यानंतर २७ फेब्रुवारी २०१७ च्या  धोरणानुसारच ही बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत असून, यासाठी २३ आॅक्टोबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. तथापि, आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनाने अंशत:  सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी  न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील  सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २०१७  च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश  दिले.  न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच  २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली  धोरणानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत  बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी २७  फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी  सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध  करून देण्यात आले असून, हे अर्ज २३ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११.५९ पर्यंत  उपलब्ध राहणार आहेत. या पोर्टलवर शिक्षकांकडून अर्ज भरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु या पोर्टलवर ओव्हरलोड झाल्याने ते वारंवार ठप्प होत असून, येत्या २३ आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांना आॅनलाईन अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येत्या २३ आॅक्टोबरच्या अंतिम मुदतीनंतर अनेक शिक्षक अर्ज करण्यापासून वंचित होण्याची भिती निर्माण झाली आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात या प्रक्रि येत बसणारे जवळपास दीड हजार शिक्षक असून, त्यामधील अद्याप निम्म्याही शिक्षकांना अर्ज करणे शक्य झाले नाही. 

टॅग्स :Teacherशिक्षक