शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाकडून जिल्हास्तर जलनायकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:55 IST

वाशिम: शासनाच्या जलयुक्त शिवार,जलजागृती आदि योजनांसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्याला सहकार्य करून जलदूत आणि जलसेवकांना सर्व पाठबळ देण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने १० जिल्हास्तर जलनायकांची निवड केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या जलयुक्त शिवार,जलजागृती आदि योजनांसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्याला सहकार्य करून जलदूत आणि जलसेवकांना सर्व पाठबळ देण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने १० जिल्हास्तर जलनायकांची निवड केली आहे. शासनाच्यावतीने राज्यात कायमस्वरुपी जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जलजागृतीसाठी विविध उपक्रम तयार करणे व ते जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जलसाक्षरता केंद्रात करण्यात आली असून, जलजागृती उपक्रम जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर अनुक्रमे जलनायक, जलकर्मी व जलसेवक अशा उत्स्फूर्त स्वयंसेवकांची संरचनात्मक शृंखला निर्माण करण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम पाटबंधारे विभागाच्यावतीने १० जिल्हास्तरीय जलनायकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोनाली तायडे, प्रभू कांबळे, सुनिता कांबळे, भाष्कर गुडदे, राजेंद्र पडघान, श्याम भुसेवार, विठ्ठल लोखंडे, श्याम सवाई, अजय काटकर आणि प्रफुल बाणगावकर यांचा समावेश आहे. ही नियुक्ती पूर्णत: स्वंयसेवक या स्वरूपाची असून, यासाठी जलनायकांना कुठलेही मानधन देय नाही. तथापि, प्रशिक्षण, क्षमता बांधणी या प्रशिक्षणासाठी त्यांना जलसाक्षरता केंद्रामार्फत निमंत्रित करण्यात येणार आहे. जलसेवक आणि जलदुतांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ प्रशिक्षक (मास्टर ट्रेनर) म्हणून काम करणे, इतर प्रशिक्षण वर्गात योदान देणे, जिल्हा व तालूकांतर्गत समन्वय ठेवणे, राज्य शासनाच्या विविध विभागाकडील जलव्यवस्थापनाशी संबंधित योजना व कार्यक्रम एकात्मिक पद्धतीने लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करणे आदि जबाबदाºया या जिल्हास्तर जलनायकांना पार पाडाव्या लागणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी